आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडर जप्त:पानटपरीमधून तीन तर घरातून 13 सिलिंडर जप्त ; दोन आरोपींना अटक

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. एक आरोपी पानटपरीतून सिलिंडर विकत होता तर दुसरा घरातून सिलिंडरचा विकत असल्याचे पोलिसांना दिसून आले. एका पानटपरीतून तीन, एका घरातून १३ असे १६ सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी केली. पोलिस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पळसोबढे येथे अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडर विकले जात आहेत. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या वेळी पोलिसांनी अमोल लांडे याच्या पानटपरीत पोलिसांना तीन सिलिंडर दिसले. पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याबाबत विचारले असता त्याच्याकडे परवाना दिसला नाही. भास्कर रामचंद्र फरकुंडेच्या घरातही पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या घरात १३ घरगुती गॅस सिलिंडर विनापरवाना विक्री करताना दिसल्याने पोलिसांनी पान टपरीतून तीन, घरातून १६ सिलिंडर जप्त केले. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील,त्यांच्या पथकाने केली.दोन आरोपींना अटक

बातम्या आणखी आहेत...