आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्रेस रद्द:तीन दिवस विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सालवा येथे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार ६, साेमवार ७ आणि मंगळवार ८ नोव्हेंबरची विदर्भ एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. याशिवाय दुरंतो, शालिमार-एलटीटी अप-डाऊन ट्रेनच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

भडली येथे करण्यात येणाऱ्या कामासाठी १२११४ नागपूर-पुणे मंगळवारी ८ नोव्हेंबर आणि १२११३ पुणे-नागपूर बुधवारी ९ नोव्हेंबर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वेळेवर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मुख्य म्हणजे दिवाळीच्या सुट्टीनंतर , नोकरदार, विद्यार्थ्यांसह अनेक मंडळी परत जात आहेत. अशात गाड्या रद्द होत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...