आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जखमी:टँकर-दुचाकी अपघातात तीन जण जखमी ; कोळंबी फाट्याजवळील दुर्घटना, एक जण गंभीर

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोळंबी फाट्याजवळ बुधवारी, ४.३० वाजताच्या सुमारास टँकर-टुव्हीलरचा अपघात झाला. यात तीन व्यक्ती जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अमरावती ते अकोला दरम्यान जी. जे. बी. एक्स १२-२३८० क्रमांकाचा टँकर मूर्तिजापूरवरून राहित-साहीत येथे जात होता. दरम्यान टँकरने मार्गावरील एका टुव्हीलरला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गाडी क्र. एम. एच. ३०-बी एम-५६७६ बाईकवरील राहित-साहित येथील रहविासी आशिष वानखडे व त्यांच्या पत्नीसह एकजण गंभीर जखमी झाला. गाडीस्वार रस्त्याच्या एका कडेला फेकले गेले. यामध्ये महिलेल्या दोन्ही पायाला मोठी दु:खापत झाली आहे. तिघांपैकी एकाच्या डोक्याला प्रचंड मार लागला आहे. अपघातामुळे काही वेळ रस्त्यावर तणावाचे निर्माण झाले. तसेच वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच कुरणखेड येथील माँ चंडीका आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींच्या उपचारासाठी त्वरीत पावले उचलली. मूर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सेनापती स्वत:ची अॅम्बुलन्स घेऊन आले व जखमींना मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात घेऊन गेले. या वेळी आपत्कालीन पथकाचे प्रमुख रंजीत घोगरे, शहाबाज शहा, राम उमाळे, वीरेंद्र देशमुख, संतोष गोगटे, शुभम दामोदर, स्वप्नील चीम, अमोल बढे, वैभव खांदेल, अतुल पुंडेकर, योगेश खांदेरी, शुभम छबिले, प्रदीप कदम, जीवन छबिले उपस्थित होते. या वेळी गावकऱ्यांनीही जखमींना उपचार मिळण्यासाठी मदत केली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...