आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना तीन महिन्यांची साखर एकाचवेळी मिळणार आहे. यात एप्रिल, मे, जूनचा सामवेश आहे. शासनाकडे साखर नसल्याने अत्योदय शिधापत्रिका धारकांना एक किलो साखरचे वितरण तीन महिन्यांपासून रखडले होते. शासनामार्फत साखरेचा साठा जिल्हा पुरवठा विभागाला मिळाला. केंद्र शासनाने फेब्रुवारी, २००१ पासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच साखर वाटपाचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनाच नियंत्रित साखरेचे वितरण करण्यात येत आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना अधिक साखर मिळावी, यासाठी प्रारंभी प्रतीमानसी ४२५ ग्रॅम ऐवजी ५०० ग्रॅम परमिाण ठरवले होते. त्यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाच्या नियंत्रित साखरेचा किरकोळ विक्रीचा दर केंद्र शासनाने १ मार्च २००२ रोजी १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो निश्चित केला होता. मात्र नंतरच्या काळात साखर वाटपावर शासनाने नियंत्रण आणले. त्याअंतर्गत प्रतमिानसी ऐवजी प्रती शिधापत्रिका साखरेचे वाटप केले. त्यासह साखरेचे परमिाणही प्रती शिधापत्रिका एक किलो निश्चित केले. त्यामुळे सध्याच्या स्थितीत अंत्योदय गटातील कार्डधारकांनाच प्रतमिाह एक किलो साखरेचे वाटप करण्यात येत आहे. परंतु तीन महिन्यांपासून अंत्योदय कार्डधारकांना साखरेचे वितरण करणे थांबवले होते. त्यामुळे लाभार्थ्यांना साखरेपासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान लाभार्थ्यांना साखरेचे वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला साठा उपलब्ध झाला. त्यामुळे लाभार्थ्यांना साखरेचे वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्राहकांना या दराने देणार साखर शासनातर्फे यापूर्वी अंत्योदय शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर खुल्या स्वरूपात देण्यात येत होती. मात्र दोन-तीन महिन्यांपासून एक किलोच्या पॅकिंगमध्ये साखरेचे वाटप करण्यात येत आहे. साखर कार्डधारकांना रास्तभाव दुकानातून २० रुपये एका किलो या दराने विक्री करणार आहे. जुलै, ऑगस्ट,सप्टेंबरचा साठा मंजूर राज्य शासनाने अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी एप्रिल, मे व जूनची साखर उपलब्ध करुन दिली असतानाच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरसाठीही साखरेचा साठा मंजूर केला. त्यामुळे गरजूंना पुढील तीन महिने साखर स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.