आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:बालसुधारगृहातून पळालेल्या आणखी तीन मुलींना घेतले ताब्यात; शहर पोलिसांची कारवाई

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्री बालसुधार गृहातून शनिवारी सात मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी तीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांना पुन्हा बालसुधारगृहात दाखल केले आहे. दोन मुली कल्याण, मुंबई तर एक मुलगी शेगावमध्ये आढळली. तीनही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सातपैकी पाच मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. गायत्री बालसुधारगृहात अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील सात अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते.

दरम्यान त्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास खिडकीची ग्रील तोडून उड्या मारून त्यांनी पळ काढला होता. येथील कर्मचारी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आले असता बराचवेळ त्यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता खिडकीच्या ग्रील तुटलेल्या दिसून आल्या व मुली पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला होता. दोन मुलींना त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पाच मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक गठीत केले आहे. त्यापैकी दोन मुलींना मुंबई येथून तर एकीला शेगाव येथून ताब्यात घेतल्याने आणखी दोन मुलींचा पोलिस शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...