आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्चार्ज:कोराेनाचे तीन नवे रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी, २८ ऑगस्टला दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ७५ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर खासगी प्रयोगशाळेतून एक असे तीन रुग्ण दिवसभरात आढळले. तर सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या १७ झाली आहे. यातील एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. उर्वरित १६ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५,८१८ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...