आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:‎थकीत वार्षिक भाड्याचा भरणा न‎ केल्याने तीन दुकानांना केले सील‎

अकोला‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाने मार्च‎ अखेरमुळे महसुल वाढीवर लक्ष‎ केंद्रित केले आहे. मालमत्ता कर‎ वसुली सोबतच आता बिओटी‎ तत्वावरील वार्षिक भाडे वसुलीकडे‎ प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. या‎ अनुषंगानेच प्रशासनाने थकीत‎ वार्षिक भाड्याचा भरणा न केल्याने‎ तीन दुकानांना सिल लावले.‎ महापालिकेचे स्वत:च्या‎ मालकीची काही दुकाने आहेत. तर‎ काही महसुलच्या जागेवर बांधलेल्या‎ दुकानांकडून महापालिका भाडे घेते.‎ त्याच बरोबर बिओटी तत्वावर‎ बांधलेल्या गाळ्याकडूनही वार्षिक‎ भाडे घेतल्या जाते. त्यामुळे‎ व्यावसायीक भाडेकरुना दरवर्षी‎ वार्षिक भाडे भरावे लागते.

मात्र‎ काही व्यावसायीकांनी वार्षिक भाडे‎ थकीत केले आहे. या थकीत वार्षिक‎ भाड्याचा भरणा करण्याबाबत‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महापालिकेने नोटीस बजावल्या.‎ मात्र त्यानंतरही वार्षिक भाड्याचा‎ भरणा न करणाऱ्या गाळ्यांना सिल‎ लावण्याची कारवाई सुरु केली‎ आहे. परिणामी उत्‍तर झोन अंतर्गत‎ आकोट फैल येथील सै.जहूर‎ सै.रियाज दुकान क्रं. १ आणि २, शेर‎ खां सरदार खां दुकान क्रं.३,‎ सै.जहूर सै.रियाज तर्फे मो.वाहीद‎ यांचे कडे बी.ओ.टी. तत्वावरील‎ दुकानांकडे १ लाख ५८ हजार २४१‎ रुपये वार्षिक भाडे थकले होते.‎

वारंवार सुचना करुनही वार्षिक‎ भाड्याचा भरणा न केल्याने या तीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दुकानांना सिल लावण्यात आले.‎ ही कारवाई आयुक्त कविता‎ द्विवेदी, उपायुक्त नीला वंजारी‎ यांच्या आदेशान्वये बाजार‎ अधिक्षक राजेश सोनाग्रे, उत्‍तर‎ झोन सहा.कर अधिक्षक हेमंत‎ शेळवणे, पथक क्रं.३ चे पथक‎ प्रमुख संजय सुर्यवंशी, बाजार‎ विभागाचे गौरव श्रीवास, यशवंत‎ दुधांडे, देवानंद मेश्राम, मो.सलीम,‎ लिपिक रफीक अहमद खान,‎ निखिल लोटे, सुरक्षा रक्षक लता‎ चोरपगार गजानन मोरे, संतोष‎ सुर्यवंशी आदींनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...