आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिष्यवृत्ती परीक्षेला तीन हजार विद्यार्थी ; 15 केंद्रांवर 200 विद्यार्थी राहिले अनुपस्थित

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ग ८ वीनंतरची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी १९ जूनला जिल्ह्यातील १५ केंद्रावर घेण्यात घेण्यात आली. परीक्षेसाठी जिल्हयातून एकूण ३ हजार ३०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी रविवारी ३ हजार ९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. तर २०३ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षेचा पहिला पेपर १०.३० ते १२, तसेच शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर १.३० ते ३ वाजेपर्यंत घेण्यात आला. अकोला जिल्ह्यात भारत विद्यालय अकोला २४५, जागृती विद्यालय, अकोला २६०, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल अकोला २०५, मांगीलाल शर्मा विद्यालय अकोला २०७, स्वावलंबी विद्यालय अकोला १२८, श्री शिवाजी विद्यालय अकोट २२३, श्री सरस्वती विद्यालय अकोट २१०, श्री नर्सिंग विद्यालय अकोट १३९, धनाबाई विद्यालय बाळापूर १७६, बाबासाहेब धाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी २५६, मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर १४१, शहा बाबू उर्दू हायस्कूल पातूर २५३, सेठ बन्सीधर विद्यालय, तेल्हारा ३२५, सहदेवराव भोपळे विद्यालय, हिवरखेड १९३, भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मूर्तिजापूर १३६अशी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोना काळानंतर ही पहिली शिष्यवृत्ती परीक्षा होती. परीक्षा केंद्र संचालक मनीषा अभ्यंकर, अरुण राऊत, इम्तियाज अहमद खान, भानुदास एन्नावार, रोहित शर्मा, संजय वालशिंगे, भूषण ठाकूर, दीपक देव, गंगाधर सोळंके, सुरेंद्र देशमुख, मोहम्मद असलम, मोहम्मद इक्बाल, राजेंद्र देशमुख, रजनी वालोकार, रवींद्र पारधी यांच्यासह जि. प. शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा झाली. या वेळी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, जिल्हा विज्ञान मंच समन्वयक डॉ. रवींद्र भास्कर, शब्बीर हुसेन, इक्बाल भाई यांनी परीक्षेचे नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...