आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे गाड्यांच्या सेवेपासून प्रवासी वंचित:तीन रेल्वे गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा नाही

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात रेल्वे गाड्यांची सेवा बंद होती. त्यानंतर अनेक रेल्वे गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन त्या सुरू करण्यात आल्या, तर काही नियमित रेल्वे गाड्याही सुरू झाल्या. तरी कोरोना काळाच्या पूर्वी प्रमाणे अद्याप रेल्वे गाड्यांची सेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या तीन गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाड्यांना कोरोना काळा पूर्वीप्रमाणे थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. गांधीधाम-पुरी एक्सप्रेस, पुरी-सुरत एक्सप्रेस आणि लोकामान्य टिळक एक्सप्रेस अकोला रेल्वे स्थानक येथे थांबत नाही. कोरोना काळा पूर्वी या गाड्या अकोला येथे थांबा घेत होत्या. अनेक गाड्या पूर्ववत सुरू झाल्या. पण या तीन गाड्यांना अद्याप थांबा मिळालेला नाही. अंत्योदय एक्सप्रेस अजून सुरू झालेली नाही. यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. पण याची दखल घेण्यात आली नाही.

अकोट-अकोला रेल्वे जालना, नांदेडला जावी दक्षिण मध्य रेल्वेकडून अकोला-अकोट रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या नाहीत. त्यामुळे अकोट-अकोला रेल्वे आठवड्यातून किमान एक दिवस जालना, तसेच नांदेडपर्यंत उपलब्ध करता येईल. प्रवाशांकडून यासाठी वारंवार मागणी होत आहे. ही सेवा सुरू झाल्यास या मार्गावरील प्रवाशांना दिलास मिळणार आहे.

भुसावळ-बडनेरा मेमाेला प्रचंड गर्दी अकोला रेल्वे स्थानक येथून पूर्वी भुसावळ, वर्धा, नागपूरमार्गावर तीन पॅसेंजर उपलब्ध होत्या. सध्या मात्र पॅसेंजर गाड्या बंद असल्याने मेमो रेल्वे गाड्या पुरवल्या आहे. परंतु सकाळी धावणाऱ्या भुसावळ-बडनेरा मेमो रेल्वे गाडीत प्रवाशांच्या गर्दी असते. सकाळी विद्यार्थी, नोकरदारांची या रेल्वे गाडीमध्ये गर्दी होते. त्यामुळे या रेल्वे गाडीचे डबे वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त हाेत आहे.

आरक्षण केंद्राची वेळ दोन तास कमी कोरोनापूर्वी रेल्वे स्थानकावर आरक्षण तिकीट काढण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतची वेळ होती. कोरोना काळात ही वेळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत केली. सध्या आरक्षण केंद्राची ही वेळआहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने ही वेळ पूर्ववत करण्यात यावी. डॉ. रवी अलिमचंदानी, विदर्भ यात्री संघ.

बातम्या आणखी आहेत...