आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल‎‎:मायलेकींचा विनयभंग करणाऱ्या‎ आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास‎

अकाेला‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायलेकींचा विनयभंग करणाऱ्या‎ आरोपीला सह जिल्हा व अतिरिक्त‎ सत्र न्यायाधीश सुनील जे. शर्मा यांच्या‎ विशेष न्यायालयाने दोषी ठरवत तीन‎ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा‎ ठोठावली. हा निकाल बुधवारी दिला.‎ सोनू शामराव कांबळे (वय २४, रा.‎ शास्त्री नगर सिंधी कॅम्प अकोला.)‎ असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे‎ नाव आहे. ३० सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी‎ ३ वाजता अल्पवयीन मुलीसह ही‎ महिला घरात असताना आरोपी सोनू‎ शामराव कांबळे याने घराच्या गेटला‎ दगड मारले व गेट लोटून आतमध्ये‎ घुसला.

त्याच्याजवळ पेट्रोलने‎ भरलेली बॉटल होती. त्याने ती बॉटल‎ महिलेच्या अंगावर फेकून मारली.‎ मात्र, महिलेने ती चुकवली. त्यानंतर‎ घरातील सामानाला लाथा मारून‎ अस्ताव्यस्त केले व महिलेशी लगट‎ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. हे‎ पाहून मुलगी रडत होती. तिलासुद्धा‎ पकडून त्याने गेटपर्यंत ओढत नेत‎ असताना महिलेने मुलीची‎ त्याच्यापासून सुटका केली आणि‎ घराचा दरवाजा बंद केला. काही‎ वेळाने महिला ही खदान पोलिस‎ ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता‎ दरम्यान आरोपी पुन्हा घरासमोर आला‎ होता. महिलेच्या अशा तक्रारीवरून‎ खदान पोलिस ठाण्याच्या सहायक‎ पोलिस उपनिरीक्षक योगिता ठाकरे‎ यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल‎ करून त्याला अटक केली व‎ तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र‎ दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने‎ आठ साक्षीदार तपासण्यात आले.‎ साक्षपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने‎ आरोपी सोनु शामराव कांबळे याला‎ महिला व तिच्या मुलीचा विनयभंग‎ केल्याप्रकरणी भादंविचे कलम ३५४ व‎ ८ पोक्सो अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी,‎ २९४ भादंवि अंतर्गत तीन महिने‎ सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड‎ अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न‎ भरल्यास १५ दिवसांची शिक्षा भादंवि‎ कलम ३२३ अंतर्गत सक्तमजुरीची एक‎ महिना शिक्षा, भांदवि ४५२ नुसार तीन‎ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली‎ आहे. सर्व शिक्षा आरोपीला सोबतच‎ भोगाव्या लागणार आहेत. सरकार‎ पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील‎ दीपक गोटे यांनी प्रभावीपणे सरकार‎ पक्षाची बाजू मांडली. तसेच मपोशि‎ प्रिया शेगोकार यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...