आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर परिसरासह जिल्ह्यात रविवारी, १९ जूनला सायंकाळी पाऊस झाला. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात ४० मिनीटे पाऊस झाला. शहरात तुरळक ठिकाणी बारीक गारांसह पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी सर्वाधिक १०३.७ मिलीमीटर पावसाची नोंद अकोला तालुक्यात झाली आहे.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन कुठेतरी तुरळक सरी येत होत्या. मात्र हुलकावणी देणाऱ्या ढगांनी रविवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. वातावरणात दिवसभर उकाडा जाणवत होता. दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारात मेघगर्जना, विजांच्या लखलखाटात पावसाला सुरुवात झाली. आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली. तापमानात घट होऊन पारा ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. उन कमी झाले असले तरी उकाडा जाणवत होता. मात्र रविवारच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजून ५ मिनीटांच्या नंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर शहरात प्रचंड मेघगर्जना आणि विजांचा लखलखाटाला सुरुवात झाली. या दरम्यान बाजार परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला असलेली प्रतिष्ठाने व व्यावसायिक सदनिकांचा आसरा घेतला होता. पुन्हा ६.१० च्या दरम्यान पावसाचा जोर वाढला होता.
वीज पडून शेतकऱ्याचा शेतात जागीच मृत्यू बोरगाव मंजू । येथे शेतात काम करताना एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी शेख इसामोद्दीन शेख इकरामोद्दीन (वय ५५ वर्ष) सायंकाळी शेतात काम करीत होते. या वेळी पावसात व विजेच्या कडकडाटामध्ये त्याच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बोरगाव मंजूचे ठाणेदार सुनील सोळंके यांनी त्यांचा मृतदेह रात्री अकोला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.
दोघे बचावले, पण दुचाकी गेली वाहून कुरणखेड | पावसाने कोळंबी जवळील पातूर फाट्यावरील नाल्याच्या प्रवाह वाढला. या वेळी हिरपूरचे दोघे दुचाकीसह खांबोऱ्यावरुन हिरपूरला जाताना पाण्यात वाहून गेले. उपस्थितांनी त्यांना नाला थांबवले. मात्र, त्यांनी पूल आेलांडायला सुरुवात केली. या वेळी ते युवक वाहून गेले होते. काही अंतरावर त्यांना बाहेर काढले. त्यात दुचाकी वाहून गेली. रणजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख, राम उमाळे, विकी खांदेल, प्रमोद गोगटे, संदीप फुलझले यांनी त्यांना बाहेर काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.