आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त बैठक:पाणंद रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम; 15 एप्रिलपासून बांधकाम होणार सुरू

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे पूर्ण होण्यासाठी साेमवारी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. जून महनि्यापर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील १३६ कामांचे नियोजन जि.प., महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले. ही बैठक बाळापूरचे शविसेचे आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली.

बाळापूर मतदारसंघात दरवर्षी शेत रस्त्यांचा मुद्दा गंभीर होत असतो. पावसाळ्यात पाणंद रस्तेच गायब झालेले असतात. शेतात जाणेही शक्य होत नाही. याचा परिणाम शेतमालाच्या वाहतुकीवरही होतो. त्यामुळे राज्याच्या नियोजन विभागाने (रोहयो) २०२२-२३ या वर्षाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना तयार केली असून, गत आठवड्यात कामांना मंजुरी दिली होती. पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी सोमवारी आमदार नितीन देशमुख यांनी बैठक घेतली. बैठकीत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते उपस्थित होते.

असा आहे कालबद्ध कार्यक्रम :
१) रस्ते जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा तीन यंत्रणांकडून होणार आहेत.
२) उपरोक्त तीनही यंत्रणा आपआपल्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी, यासाठीचा प्रस्ताव १० एप्रिलपर्यंत संबंधित तहसीलदारांना सादर करणार आहेत.
३) संबंधित तहसीलदार सोमवार ११ एप्रिलपर्यंत प्रस्तावांना मंजुरी प्रदान करणार आहेत. ४) कार्यारंभ आदेश शुक्रवार १५ एप्रिलपर्यंत जारी होऊन लगेच कामही सुरू होणार आहे.

असे आहेत तालुकानिहाय रस्ते
१) बाळापूर:- तालुक्यात ६७ ठिकाणचे पाणंद रस्ते होणार असून, यातून ९८ कि.मी. रस्त्यांचे जाळे विणले जाईल.
२) पातूर: तालुक्यातील ४६ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात होणार असून, ६५.५ कि.मी. चे रस्ते तयार होतील.
३) अकोला : तालुक्यातील २३ रस्ते मंजूर झाले असून, २६.५० कि.मी.पर्यंतच्या रस्त्यांचे जाळे विणणार आहे.

या यंत्रणा करणार रस्ते
जि. प. सर्कलनिहाय पाणंद रस्त्यांचे नियोजन केले आहेत. कोणती यंत्रणा कोणते रस्ते करणार, हेही निश्चित केले.
१) जिल्हा परिषद : सस्ती, आलेगाव, मळसूर, वाडेगाव, पारस, देवगाव, आगार, उगवा सर्कलमधील कामे जि.प.
करणार आहे.
२) बांधकाम विभाग : शिर्ला, निमकर्दा, व्याळा, अंदुरा सर्कलमधील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग
करणार आहे.

वाडेगाववर लक्ष : बाळापूर मतदारसंघात सर्वात मोठ्या वाडेगाव येथे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या गातील ८ पाणंद रस्त्यांचे डांबरीकरणही करणार आहे. पाणंद रस्त्यावर डांबरीकरणाचे काम हे प्रायोगिकतत्वावर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...