आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली जवळ:अकोल्यात निर्माल्य रथ गुरुवारपासून कार्यान्वित, वॉर्डात फिरून करणार संकलन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्थी अर्थात शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस जवळ आला आहे. दरवर्षी उत्साहात वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. यंदा ही निरोप आपण उत्साहात देण्यात येणार आहे. 8 सप्टेंबर सकाळी 9 पासून निर्माल्य रथ कार्यान्वित करण्यात येत आहे. आपण आपला भागातील वेळेनुसार श्रींच्या चरणी अपर्ण हार, फुले, दूर्वा, बेल, इत्यादी निर्माल्य रथामध्ये टाकून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा असेल रथाचा मार्ग

गुरुवार सकाळी 9 वाजता श्री सिद्धिविनायक विनायक मंदिरपासून रथ सुरु होईल. पुढे जठारपेठ येथील श्री सौरभजी भगत यांची गल्ली, श्री सुदर्शनजी देशपांडे, श्री जकाते काका प्रसाद कॉलोनी यांची गल्ली , रामदूत अर्पा., अहिर काका, मनमोहन जोशी यांची गल्ली, कावेरी अर्पा, शिवाभाऊ मोकलकर गल्ली सिद्धी विनायक मंदिर ज्योती नगर परिसर त्यानंतर बिर्ला रामा एम्पायर, विजू वाघ यांच्या दुकानाच्या बाजूची गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, ऐकदंत अपार्टमेंट, सातपुते, ओंकार अपार्टमेंट, नंतर तापडिया या नगरच्या 5 गल्ल्या व महाजणी प्लॉट गल्ली

दुपारनंतरचा मार्ग

निखिलेश दिवेकर यांची गल्ली, गोविंद अर्पा., अनील मामा कौसल यांचा वाडा, विजय वाघ यांची गल्ली, अॅड. गणेश पाठक यांची गल्ली, राजू सोनी यांची गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, मनोज सोमण यांची गल्ली, पंकज लाहोळे गल्ली, शंकर नगर अॅड. भरत देशपांडे यांच्या घराजवळील भाग, माधव देशमुख यांचे अपार्टमेंन्ट, दिलीप देशपांडे यांचे वैभललक्ष्मी अपार्टमेंट, हरताळकर काकाची गल्ली, निखिल पांडेची गल्ली येथे होईल.

सायंकाळनंतरचा मार्ग

त्यानंतर दूपारी 4 नंतर गुप्ते रोड, न्यु गुप्ते रोड, ब्राह्मण सभा रोड, त्यानंतर 5 नंतर उत्तरा कॉलनी , संध्याकाळी 6 नंतर न्यु तापडीया नगर, रात्री 8 वाजता नंतर गड्डम प्लॉट, रामदास पेठ, बिर्ला कॉलोनी येथे निर्माल्य संकलन करण्यात येईल. दोन्ही दिवस म्हणजे 8 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 2022 याच मार्गाने निर्माल्य रथ कार्यान्वीत राहिल.

सातव चौकात गणेश विसर्जन कुंड

जठारपेठ, न्यू तापडीया नगर, ज्योती नगर, तापडीया नगर, उमरीचा काही भाग या ठिकाणच्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदा सातव चौकात गणेश विसर्जन कुंड उपलब्ध राहणार आहे. अ‍ॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प तसेच निलेश देव मित्र मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणच्या प्रभाग तीनमधील व इतर भाविकांना गणेश मूर्तीचे विर्सजन सुरक्षितपणे करता यावे, याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...