आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार लूटपाट करण्यासाठी:आमदार बच्चू कडू-रवी राणांचा वाद म्हणजे हिस्स्याचा वाद; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे हिस्स्याचा वाद आहे, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. नाना पटोले हे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे माध्यमांशी बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले की, या दोघांचे हे हिस्स्याचे भांडण आहे. महाराष्ट्राचा शेतकरी असो. महाराष्ट्रातील बेरोजगार असो, गरीब माणूस असो की उद्योग असो, यासंदर्भात कुठलीही चर्चा केली जात नाही. आता हे सत्तेच्या हिस्सेवाटीचा प्रश्न आहे. 50 खोके अन् महाराष्ट्राची जे काही बदनामी झालेली आहे, हे तर गंभीर आहेच पण सत्तेमध्ये बसलेले आमदार 50 खोक्यांसाठी भांडत असतील, आरोप प्रत्यारोप करत असतील, त्याच्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. म्हणून यापेक्षा आम्हाला या दोघांच्या भांडणावर लक्ष देण्याचं काही कारण नाही. असेही पोटोले म्हणाले.

अकोला जिल्ह्यात सलग खुलेआम हत्येच्या घटना घडत आहेत. यामध्ये शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखावर गजबजलेल्या भर चौकात चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली. जिल्ह्यात प्राणघातक हल्ले होताहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यासाठी सहा सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेऊन बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. दरम्यान राज्यातच कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, कुठेही सरकारचे लक्ष नाही. केवळ जनतेचे पैसे जे राज्याच्या तिजोरीमध्ये आहे, ते पैसे लुटण्यासाठी हे सरकार बनलेले आहे. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टीच्या आधारावर महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी ईडीचे सरकार निर्माण झालेला आहे. ते फक्त लूटपाट करण्यासाठी असून लोकांच्या सुरक्षेसाठी नाही असाही आरोप नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...