आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:आज लाेकअदालत : दीड लाख वाहनधारकांना दंड भरणा नोटीस

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवार, १२ नोव्हेंबरला लोकअदालतचे आयोजन केले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी १ लाख ४८ हजार ७६६ वाहनधारकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड दिला होता. त्या वाहनधारकांच्या मोबाइलवर मेसेजच्या माध्यमातून समन्स पाठवले आहेत. अशा वाहनधारकांना दंडाच्या रकमेच्या भरणाबाबत तडजोडीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना मोटर वाहन कायद्याअंतर्गत कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते. कारवाई दरम्यान काही वाहनधारकांविरुद्ध आकारण्यात आलेले दंडाची रक्कम ही त्यांच्याकडे प्रलंबित असते. आजपर्यंत १ लाख ४८ हजार ७६६ वाहनधारकांवर केसेस करण्यात आल्या. अशा वाहनधारकांकडे ६ कोटी ३३ लाख ७९ हजार रुपये ई-चलान थकबाकी आहे. या वाहनधारकांनी प्रलंबित ई-चलान दंड भरण्यास लोक अदालतमध्ये हजर रहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...