आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:उद्या रोजगार मेळावा; 86  पदांच्या भरतीचे नियोजन

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार , ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात ८६ पदांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार इच्छुक युवक युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. रोजगार मेळाव्‍यात रॅलीज इंडिया लिमीटेड, एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण १० पदे , लिबेन लाइफ सायंन्स प्रा.लि. एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण १५, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, अकोला यांनी एकूण ३० पदे, एम.एम.इंडस्ट्रिज प्रा.एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण ८ पदे , नमस्ते वेन्चर प्रा.लि.अकोला येथे एकूण २३ पदांसाठी भरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...