आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया या कनिष्ठ महाविद्यालयस्तरावरच होत आहे. त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी आता शेवटचा एक दिवस शिल्लक राहिला आहे. सोमवारी १ ऑगस्टला तिसरी आणि शेवटची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी प्रवेश क्षमता निश्चित केली असून, त्याअधीन राहूनच प्रवेश देण्यात येत आहेत. सीबीएसई व आयसीएसई निकाल उशीरा जाहीर झाले. त्यामुळे त्यांच्यासाठीही जागा रिक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशाबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षण विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.