आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:आगर येथे कब्बडी स्पर्धेत तोंडगाव संघ विजेता‎

आगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विश्व शांती क्रीडा मंडळ व अकोला‎ जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने‎ आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम‎ फेरीत तोंडगाव संघ व शिव प्रतिष्ठान संघ अकोला‎ यांच्यामध्ये चुरशीच्या लढतीत तोंडगाव संघ विजेता‎ ठरला. या संघाला ३१ हजार एक रुपये बक्षीस देण्यात‎ आले. तर उपविजेत्या संघाला २१ हजार एक रुपये देण्यात‎ आले.

तसेच तिसरे व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे‎ बेलखेड व शहापूर संघाला देण्यात आले. तिन दिवस‎ चाललेल्या खेळामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा व‎ अमरावती येथील ३२ संघांनी भाग घेतला होता. खेळांचा‎ आनंद घेण्यासाठी कबड्डी शौकिनांनी मोठी गर्दी केली‎ होती. संचालन प्रवीण शेषराव शिरसाट यांनी केले होते .‎ खेळ यशस्वी करण्यासाठी विश्व शांती क्रीडा मंडळ,‎ हनुमान क्रीडा मंडळ व प्रज्ञावंत क्रीडा मंडळ यांच्यासह‎ गावकरी व खास बाब म्हणजे बच्चे कंपनी यांनी विशेष‎ परिश्रम घेतले. यादरम्यान जिल्हा कबड्डी असोसिएशनचे‎ अध्यक्ष संग्राम गावंडे, सचिव वासुदेवराव नेरकर, अकोट‎ फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रसार व त्यांचे सहकारी,‎ तसेच राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या अनेक‎ खेळाडूंनी भेट देऊन आगर वासियांचे कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...