आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:वाहतुकीची कोंडी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने, युवक कार्यकर्त्यांनी जाळले टायर

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्डप्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्याचे पडसाद बुधवारी १५ जूनला अकोला येथे उमटले. काँग्रेसतर्फे मध्यवर्ती बस स्थानकासमोर असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर युवक काँग्रेसतर्फे टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. दोन्ही आंदोलनांमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्रातील मोदी सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसने १६ जूनला आक्रमक पवित्रा घेतला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेल्या चौकशीचा निषेध करीत दुपारी २ वाजता काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या स्वराज्य भवन येथे नेते आणि कार्यकर्ते जमले. काही वेळानंतर त्यांनी समोरच असलेल्या मदनलाल धिंग्रा चौकात धाव घेतली. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीची कोंडी झाली होती. शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, साजिद खान पठाण, उपाध्यक्ष कपिल रावदेव, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, पराग कांबळे, सागर कावरे आदी सहभागी झाले होते. वाहन चालक - पोलिसांमध्ये वाद ः आंदोलकांनी मदनलाल धिंग्रा चौकातून टॉवरकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. रास्ता रोको केल्याने पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवली होती. या वेळी तीन ते चार वाहन चालक व पोलिस व आंदोलकांमध्ये वाद झाला.मात्र नेत्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला.

युवक काँग्रेसची निदर्शने

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधीची इडी करीत असलेल्या चौकशीचा निषेध करीत युवक काँग्रेसने बुधवारी दुपारी टायर जाळून आंदोलन केले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाद्वारे सूडबुद्धीने कारवाई सुरू केली. ही काँग्रेस व नेत्यांची बदनाम करण्याचा प्रकार आहे, अशी टीका युवक काँग्रेसने करीत आंदोलन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ जिल्हा युवक काँग्रेसने टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि भाजप प्रणित ईडी व केंद्र सरकारविरोधात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे, मोहम्मद शरिक, अमोल ठोकणे, अर्षद खान, अश्वनि खडसे ,वैभव सुरडकर, अक्षय गडेकर ऋषिकेश सनगाळे, सम्राट ठाकरे, तेजस देवबले, हर्ष ढोरे, संतोष निधाणे, शुभम पौल, अमर साबळे, राम कोकाटे,गुड्डू सारवाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

बेरोजगारी, वाढत्या महागाईसह देशात अनेक प्रश्न दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहेत. मात्र जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्राला वेळ आहे. केंद्र सरकार काँग्रेसच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कार्यवाही करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. बेरोजगारीवर बोलणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार कार्यवाही करत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली. हे प्रकार बंद न झाल्यास काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही नेत्यांनी आंदोलनादरम्यान दिला. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्याने काँग्रेसतर्फे मदनलाल धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या छायाचित्रात युवक कॉंग्रेसने दुपारी या चौकशीचा निषेध करीत खुले नाट्यगृहासमोर टायर जाळून आंदोलन केले.

विविध घोषणांनी दणाणला गांधी रोड

युवक काँग्रेसने केलेल्या घोषणांमुळे गांधी रोड दणाणला होता. ‘केंद्रातील मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जब जब मोदी डरता ईडी को सामने करता है’, ‘ पहले लढे गोरेसे अब लढेंगे चोरोसे, अशा घोषणा युवकांनी दिल्या. केंद्रातील भाजप सरकारवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांनी आंदोलनादरम्यान टीकास्त्र सोडले. भाजप प्रणित केंद सरकाकडून देशातील युवकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राहुल गांधी व काँग्रेसची प्रतिमा मलनि करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप कवडे यांनी केला. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...