आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 ते 20 वयोगटात विभागणी‎:अकोला क्रिकेट क्लब येथे प्रशिक्षण शिबिर‎

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला क्रिकेट क्लब येथे ८ ते २०‎ वर्षाखालील शहर व जिल्ह्यातील मुला व‎ मुलींकरता उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे‎ आयोजन अकोला क्रिकेट क्लब तर्फे करण्यात‎ येत आहे. शिबिर १७ एप्रिल ते ३१ मे पर्यंत असून‎ शिबिरातील मुलांचे ८ ते २० वयोगटात विभागणी‎ करण्यात येणार आहे. सुरुवातीला मुलांना‎ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचे प्राथमिक‎ प्रशिक्षण देवून नंतर नेट सराव व शिबिराचे‎ उत्तार्धात सामने खेळवण्यात येतील. शिबिरात‎ खेळाडूं करता आहार तज्ञद्वारे आहारविषयक‎ मार्गदर्शन सेमिनार घेण्यात येईल. शिबिरा करता‎ १२ ते १६ एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते ११, सायंकाळी‎ ३ ते ५ या वेळेत अकोला क्रिकेट क्लब येथे प्रवेश‎ देणे सुरु आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत अकोला‎ क्रिकेट क्लब येथे प्रवेश अर्ज भरून आपला‎ प्रवेश निश्चित करावा असे आवाहन अकोला‎ क्रिकेट क्लबतर्फे करण्यात आले.‎