आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 सप्टेंबरला कार्यक्रम:‘सीबीसीएस’च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठात शिक्षक, तज्ज्ञांचे प्रशिक्षण

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीसीएस अभ्यासक्रमाच्या अमंलबजावणीसाठी शिक्षक, तज्ज्ञांचे प्रशिक्षण १० सप्टेंबर राेजी आयाेजित करण्यात आले जल्ह्यातील महािवद्यालयातील शिक्षक व शिक्षण तज्ज्ञ कार्यक्रमात सहभागी हाेणार आहेत. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य वृद्धींगत करणारे अभ्यासक्रम शिकता येतील, असा दावा हाेत आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा व आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चार विद्याशाखांतील सर्व अभ्यासक्रमांना सी.बी.सी.एस. पद्धत लागू केली आहे. त्यांतर्गत सुरुवातीला दीक्षारंभ कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयांमध्ये पार पडला. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण व सी.बी.सी.एस. पद्धतीची माहिती देण्यात आली. नवीन पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, यासाठी १० सप्टेंबर रोजी विद्यापीठात अभ्यास मंडळाचे सदस्य, पाचही जिल्ह्रांच्या संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक व इतर तज्ज्ञ यांचेकरीता प्रशिक्षण व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण आयोजनासाठी मानव संसाधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रसाद वाडेगांवकर, सहसंचालक डॉ. वर्षा शिवानंद कुमार तसेच तेथील कर्मचारी परिश्रम घेत आहेत

हे देणार प्रशिक्षण ः सी.बी.सी.एस. प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, शिक्षकांना मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देणार आहेत. या मास्टर ट्रेनर्सनी सी.बी.सी.एस. प्रणालीचा बारकाईने अभ्यास केला असून, पी.पी.टी. द्वारा सादरीकरण करुन सहभागी शिक्षकांना प्रशिक्षित करतील. प्रशिक्षित शिक्षक जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांतील नियमित व सी.एच.बी. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती प्रशिक्षणाद्वारे देणार आहेत.

विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होणार
केवळ पदवी घेवून चालणार नाही, तर कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. िवद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्य विकसित करणारी सी.बी.सी.एस. अभ्यासक्रम प्रणाली असून या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य वृद्धींगत करणारे अभ्यासक्रम शिकता येतील. याशिवाय यात इंटर्नशीपचा समावेशसुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धींगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...