आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे हाल:रेल्वेगाड्या बंद, एसटी बसच्या फेऱ्या अपुऱ्या; प्रवाशांचे हाल

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वे मार्गावरील १५४ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल पाडणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार २० नोव्हेंबरपर्यंत २७ तासांचा जम्बो ब्लॉक आहे. यमुळे या मार्गावरील गाड्या सोमवारपर्यंत बंद आहेत. यामुळे प्रवाशांचा ओढा एसटीकडे वाढला. मात्र, महामंडळाकडून यादृष्टीने नियोजन केल्याचे दिसत नाही. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत.

अकोला येथून अमरावती, शेगाव, खामगाव, नेर, मूर्तिजापूर, नागपूर मार्गावरील गाड्यांत प्रवाशांची गर्दी दिसत आहे. गाड्या स्थानकावर येताच भरून जात आहे. प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. गर्दीमुळे काही प्रवासी परत जात आहेत. रविवारमुळेे गर्दी वाढीची शक्यता आहे. सोमवारी गाड्या बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांंचा ओढा वाढेल. परिणामी महामंडळाने गर्दीच्या मार्गावर जादा फेऱ्या सोडाव्या, अशी मागणी हाेत आहे.

शिवशाहीत अस्वच्छता ः महामंडळाने शिवशाही गाड्या सुरू केल्या. प्रारंभी या गाड्या सुस्थितीत होत्या. पण आता या गाड्या अस्वच्छ असतात.खिडकीच्या काचा बंद असत्याने प्रवासी तिथेच कचरा टाकतात. याकडे लक्ष देण्याची गरज औरंगाबाद येथील प्रवासी अमित जानोळकर यांनी व्यक्त केली.

एसटीच्या गाड्यांची अवस्था वाईट
एसटीवर लोकांचा विश्वास आहे. खासगी बसमध्ये प्रवास करणाऱ्यापेक्षा एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एसटीची सेवा अधिक सुसज्ज असल्यास यात पुन्हा नक्कीच वाढ होईल. पण दिवसेंदिवस बस गाड्यांची स्थिती अधिकाधिक वाईट होत आहे. चंदन निकोशे, प्रवासी, बुलढाणा.

तिकिटामध्ये वाढ, पण सुविधांत नाही
दिवाळीमध्ये एसटीने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. पण प्रवाशांना याबदल्यात कुठल्या सुविधा दिल्या? उलट प्रवाशांनी गर्दीमध्ये उभे राहून प्रवास केला. यापूर्वी तिकिट दरात वाढ करण्यात आली होती. तिकिटात वाढ करताय, मग सुविधेमध्ये भर का पडत नाही?, असा प्रश्न आहे.अभय राऊत, मूर्तिजापूर.

एसटी महामंडळाच्या नियोजनाचा अभाव
बसची अनेक मार्गावर मागणी आहे. पण बसच उपलब्ध नाही. उत्सव काळात एसटीवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. यासाठी नियोजनाचा अभाव जाणवतो. आता रेल्वे तीन दिवस बंद आहे. अशावेळी वर्दळीच्या मार्गावर अधिक बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रभाकर गावंडे, अकोला.

बंद असलेल्या रेल्वे
रविवारी २० नोव्हेंबर रोजी मुंबई - अमरावती एक्सप्रेस, मुंबई - हावडा एक्सप्रेस, मुंबई - निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मुंबई - हावडा दुरांतो एक्सप्रेस, मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, तर साेमवारी २१ नोव्हेंबर रोजी मुंबई - हावडा एक्सप्रेस, मुंबई - हावडा दुरांतो एक्सप्रेस, मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, मुंबई - नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई - हावडा मेल नागपूर मार्गे आदी गाड्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...