आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा व परिक्षेत्रात कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या शुक्रवारी केल्या. त्यात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची बदली नागपूर शहर येथे झाली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत पोलिस निरीक्षक अनिल जुमडे यांची बदली अकोल्यात झाली. बुलढाणा येथील पोलिस निरीक्षक अलका निकाळजे यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्रत झाली. मनोज बहुरे यांची औरंगाबाद येथून अकोल्यात बदली झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संगीता रंधे यांची बदली नागपूर शहर येथे झाली. पोलिस उपनिरीक्षक सुकेशिनी जमधाडे यांची बदली राज्य गुन्हे विभागात तर वाशीम येथील गणेश कोथळकर यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्रात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...