आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 जून प्रयोगाचे उद्घाटन:स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीचा विदर्भातील पहिला प्रयोग कपाशीमध्ये, 200 फूटावर होणार 1 हजार वृक्षांची लागवड

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान चिंतेचा विषय झाला आहे. वाढते तापमान कमी करण्याच्या उद्देशाने स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीचा विदर्भातील पहिला प्रयोग कपाशीमध्ये राबविला जात आहे. या प्रयोगाचे उद्घाटन जागतिक 5 जून पर्यावरण दिनी करण्यात येणार आहे.

O4U अर्थात 'ऑक्सीजन आपल्या सर्वांसाठी' या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षक्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या प्रयत्नातून हे मॉडल तयार करण्यात आले आहे. स्वस्तिक मॉडेलचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोला जिल्ह्यातील कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तयार करण्यात आले आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीचा सोहळा पार पडणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विदर्भातील पहिल्या प्रयोगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अशी होणार वृक्षांची लागवड

एकूण 200 फुटावरील परिसरामध्ये 1 हजार वृक्षांचे रोपण स्वस्तिक मॉडेल अंतर्गत करण्यात येते.2 फुटानंतर एक रोप लावण्यात येते. रोपांमध्ये कमी अंतर असते. यामुळे एकमेकांशी स्पर्धा करून रोपे वेगाने वाढतात, असे यामागील विज्ञान आहे. यापूर्वी लातूर येथे हा प्रयोग करण्यात आला आहे. येथे तो यशस्वी ठरला.

25 प्रजातींच्या रोपांचा समावेश

स्वस्तिकमध्ये निम, आवळा, उंबर, बादाम, शिरस, सिसम, बेल, सिमाफळ, रामफळ, कदम, आंबा, चिंच, कडूबदाम, सेमल आदी 25 प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 25 रोपानंतर पुन्हा तिच रोप रोवण्यात येईल. अशी एकूण 1000 रोपटी मॉडेलमध्ये रोवण्यात आली आहेत.

संगोपणासाठी यशस्वी मॉडेल

एक व्यक्ती हजार वृक्षांचे संगोपण करून शकत नाही. मात्र, स्वस्तिक मॉडेल अंतर्गत हे शक्य आहे. शिवाय स्वास्तिक आतील रिकाम्या जागेचा उपयोग लॉन किंवा कार्यक्रमासाठी करता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...