आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे‎:एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे‎ अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत‎ झाला. महान येथील जलशुद्धीकरण‎ केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या‎ एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिन्यांवर‎ झाडे कोसळल्याने २० ते २२ तासांपासून‎ वीजपुरवठा खंडीत असल्याने संपूर्ण‎ शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे‎ ढकलण्यात आला आहे.‎ मागील दोन ते तीन दिवसांपासून‎ शहरासह जिल्ह्यात अवकाळी‎ पावसाने थैमान घातले आहे. पिकांचे‎ नुकसान झाले असताना मोठ्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रमाणात झाडे कोसळल्याने अनेकांना‎ आपले प्राण गमवावे लागले. तसेच‎ विद्युत तारांवर झाडे कोसळ्याने‎ वीजपुरवठा खंडीत झाला.

महान‎ येथील जलशुद्धीकरण केंद्राला एक्स्प्रेस‎ फिडरने वीज पुरवठा केला जातो.‎ पिंजर ते कंझरा या दरम्यान तसेच‎ बार्शीटाकळी ते महान या दरम्यान‎ एक्स्प्रेस फिडरच्या विद्युत वाहिनीवर‎ झाडे पडल्याने एक्स्प्रेस फिडरचा‎ विद्युत पुरवठा खंडीत झाला.‎ जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा‎ रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री आठ‎ वाजता बंद झाला. पहाटे दोन वाजेपर्यंत‎ अधुन-मधून वीजपुरवठा सुरु होत‎ होता तसेच खंडित होत होता. मात्र‎ पहाटे दोन वाजतापासून बंद झालेला‎ विद्युत पुरवठा सायंकाळी सहा‎ वाजेपर्यंत सुरु झाला नव्हता.‎