आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हर घर तिरंगा; राष्ट्रध्वजाची मागणी वाढली

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा' अभियान राबवण्यात येत आहे. यात नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. या उपक्रमासाठी अकोलेकर उत्सुक आहेत. त्यामुळे नागरिकांकडून तिरंगा झेंड्याची खरेदी केली जात आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यंदा राष्ट्रध्वजाची विक्री अधिक होत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी ‘हर घर तिरंगा' उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रध्वजाची विक्रमी विक्री होण्याची अपेक्षा आहे.

येथे विविध आकाराचे राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी खादी ग्रामोद्योगला पसंती देण्यात येते. दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्टला खादी ग्रामोद्योग ध्वज मागवत असतो. यावर्षी अभियानाबाबत नागरिकांत असलेला उत्साह पाहता विक्रेत्यांनी अधिक मालाची तयारी ठेवली. काही दुकानात गत वर्षीचा शिल्लक माल संपलेला आहे.

१५० तिरंगा ध्वजाची विक्री
जि. प. कार्यालयापुढे तिरंगा झेंड्याच्या विक्रीसाठी दुकान लावले. बचत गटांच्या महिलांनी हे राष्ट्रध्वज तयार केले. सोमवारी एका दिवसात १५० तिरंगा विकले. स्वातंत्र्य दिनामुळे विक्रीस प्रतिसाद वाढीची शक्यता आहे. मीनाक्षी दाभाडे, बचतगट स्टॉलधारक

असे आहेत तिरंगा ध्वजाचे दर
आकार आणि कापडानुसार तिरंगा ध्वज खरेदीसाठी उपलब्ध आहे. जि. प. कार्यालयापुढे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या दुकानामध्ये २० बाय ३० चा तिरंगा ३० रू. किंमतीमध्ये आहे. याशिवाय इतरही दुकानांमध्ये विविध आकारांमध्ये तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे कागदी, लॉकेट, ब्राऊच अशा स्वरूपातही तिरंगा ध्वज आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...