आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कार्यालयांवर रोषणाई:जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकेल तिरंगा : जिल्हाधिकारी

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार घरांवर तिरंगा फडकवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तशी तयारीही सुरू आहे. प्रत्येकाने दिवाळीसारखा सण साजरा करावा, समाजातील सर्वच घटक यानिमित्ताने झटत आहेत, असे जिल्हाधिकारी नीमा अरोरा म्हणाल्या.

जिल्हाधिकारी अरोरा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन घरोघरी तिरंगा अभियानाची माहिती दिली. महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार हे प्रत्येक घरावर तसेच कार्यालयावर झेंडा फडकवण्यासाठी विविध सामाजिक संस्था व संघटनांसोबत चर्चा करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी तिरंगा घरावर लावणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

मनपा कर्मचारी प्रत्येक घरी पोहाेचतील
मनपा आयुक्त कविता द्विवेदी म्हणाल्या की, मनपातर्फे झेंड्यांचे वितरण करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक घरी हे कर्मचारी पोहोचतील. १० ऑगस्टपर्यंत वितरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. झेंडा देताना झेंड्याचा सन्मान कसा राखावा याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे छापील पत्रक सोबत देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी हे पर्व उत्साहात साजरे करावे.

८ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे केलेे आयोजन
८ ऑगस्ट रोजी अकोला शहरात रिले शर्यत, दि. ९ रोजी स्वराज महोत्सव, १० ऑगस्टला दुचाकी रॅली, ११ रोजी महिलांची दुचाकी रॅली, १२ ऑगस्टला सायकल यात्रा, १३ रोजी पोलिस विभागातर्फे मॅरेथॉन शर्यत, १४ रोजी क्रीडा संकुल येथे गिटार वादन व योगिक क्रियांचे सादरीकरण, तर १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम.

बातम्या आणखी आहेत...