आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:दहातोंड्याजवळ दुचाकीला ट्रकची धडक; पती-पत्नी ठार

मूर्तिजापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर-कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील दहातोंडा फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच करून अंत झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. मूर्तिजापूरकडून कारंजाकडे दुचाकी क्र.एम.एच.-३७-एस-५७३४ ने कारंजाकडे जाताना मूर्तिजापूर ते कारंजा महामार्गावरील दहातोंडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव आलेला ट्रक क्र. एम.एच.-४०-टी.डी.-२२८३ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मृतकांजवळ मिळालेल्या ओळख पत्रावरून मृतक विनोद वासुदेवराव वानखडे व सविता विनोद वानखडे रा. मेहा (धनज) ता. कारंजा, जि. वाशीम येथील रहिवासी आहेत. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी जवळपास १० ते १५ फूट रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत मृतक विनोद वानखडे यांच्यासह फेकली गेली होती.

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पांडव, पोलिस उपनिरीक्षक मानकर, पो. हे. काँ. गजानन थाटे, पो. काँ. नीतेश मद्दी घटनास्थळी पोहोचले होते. अपघात झाल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...