आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या दोन आरोपींना तीन वर्षांचा कारावास

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​एका शालेय विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने मंगळवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठाेठावली. राम राजेंद्र महल्ले (२२) व शुभम गोपाल काकड (२२, रा. वृंदावन नगर, शिवर, अकोला) अशी आरोपींची नावं आहेत.

पिडीत मुलगी ही २६ जानेवारी २०२७ रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रमानंतर शिवणीकडून शिवरकडे पायी जात होती. दुचाकीवर आलेल्या आरोपीने तिच्या मागे-पुढे फेऱ्या मारल्या. तिला विनाकारण त्रास दिला. तसेच काही दिवसांनी सायकलने जात असताना आरोपीने सायकलच्या समारेच्या कॅरिअरमध्ये चिठ्ठी टाकली व निघून गेला. मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. याबाबत तिच्या वडिलांनी राम महल्ले याला विचारले असता त्याने वडिलांसोबत भांडण करुन धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी १० मे २०१७ रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...