आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याचे दोन खेळाडू आयपीएल 2023 खेळणार:दर्शन, अथर्वला मागील संघाने ठेवले कायम; मागील संघाने ठेवले कायम

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे व सलामीला खेळणारा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे यांना 2023 मध्ये सुरु होणाऱ्या आय. पी. एल स्पर्धेकरिता अनुक्रमे गुजरात टायटन व किंग्स इलेवन पंजाब संघाने आपल्या संघात कायम ठेवले आहे.

डिसेंबर महिन्यातील ऑक्शनपूर्वीच कायम

पुढील डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छोटे ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी यांना कायम ठेवले आहे, दर्शनची आय.पी.एल स्पर्धेकरीता हि पाचव्यांदा निवड असून यापूर्वी मागील ३ सिझन दर्शनने किंग्स इलेवन पंजाब संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. तसेच मागील सिझनमध्ये गुजरात टायटन संघाकडून दोन सामन्यात चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.

अशी आहे दर्शनची कामगिरी

दर्शनने यापूर्वी वयोगट 14, 16, 19, 23 स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले असून 19 वर्षीय भारतीय संघाकडून इंग्लंड येथे कसोटी सामना तर आशिया कप करिता मलेशिया येथे 19 वर्षीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर पाच वर्षापासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व करित आहे. तसेच मागील सिझन मध्ये दर्शनने मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध खेळताना चार चेंडूत चार बळी घेयून भारतातला दुसरा तर जगातील 9 गोलंदाज म्हणून रेकॉर्ड केला आहे.

अथर्वला दुसऱ्यांदा संधी

अथर्व तायडे याला दुसऱ्यांदा पंजाब संघाकडून आय.पी.एल स्पर्धेत प्रतीनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यावर्षी निश्तिच त्याला प्लेयिंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळेल असा विश्वास आहे. अथर्व तायडे याने यापूर्वी 16, 19, 23 वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच 19 व 23 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. यावर्षी दोन्ही खेळाडूनी मुश्ताक अली व विजय हजारे स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले आहे.

खेळाडूंचे यश प्रेरणादायी

अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर म्हणाले की, गेल्या 8-9 वर्षापासून क्लवच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील उदयन्मुख क्रिकेटखेळाडूंकरिता प्रेरणादायी आहे.

बातम्या आणखी आहेत...