आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचा बुडून मृत्यू:नदीपलीकडे पालकांना भेटण्यासाठी निघालेली दाेन मुले नदीत बुडाली

तेल्हारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावात विद्रूपा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ऋषी संतोष सुरळकर (१३) सागर संतोष दांडगे (१३) अशी या मुलांची नावे आहेत. मृत मुले रविवारी दुपारी विद्रूपा नदीपलिकडे पालकांना भेटण्यासाठी जात होती. तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावातील ऋषी संतोष सुरळकार, सागर संतोष दांडगे आणि पीयूष आशिष तायडे हे तिघे मित्र ऋषी आणि सागर यांच्या पालकांकडे चालले होते. दरम्यान, या दोघांचेही वडील शेत मजूर आहेत. ज्या शेतात त्यांचे वडील काम करीत होते. ते विद्रूपा नदीच्या दुसऱ्या काठावर होते. शेत रस्ता नदीच्या पात्रातून असल्याने ही मुले नदीतून जात होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. यात मुलांचा मृत्यू झाला. याची माहिती सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने गावकऱ्यांना दिली. लागलीच मुन्ना पाथ्रीकरसह अन्य गावकरी नदीकाठी पोहचले. त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. बुडालेल्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत सागर आणि ऋषींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

कुटुंबाला मोठा धक्का या घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळताच तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड आणि पोलिस कर्मचारी संदीप तंडूलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती सुरळकर आणि दांडगे कुटुंबाला मिळताच त्यांना धक्का बसला. गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...