आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसरात खळबळ:उगवा येथे दोन शेतकरी पुत्रांनी घेतला गळफास; दोन्ही घटना एकाच दिवशी

आगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगर येथून जवळच असलेल्या उगवा येथील दोन युवा शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री घडली.उगवा येथील शेतकरी पुत्र सुभाष शेषराव भातकुले वय ३६ व आशिष गोपीचंद अडसुळे वय ३५ यांनी सततच्या नापिकीमुळे २३ अाॅगस्टला रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पाेलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी संजय कुंभार, अरुण खंडाळे, रामेकर मेजर यांनी उगवा येथे पोहोचून पंचनामा केला.

सुभाष भातकुले यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. या शेतात खरिपाची पेरणी होताच मोर्णा नदीला आलेल्या पुरात जमीन खरडून गेली. गत वर्षाच्या जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले होते. या प्रकाराने खचून त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, वडील, असा मोठा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

आशिष गोपीचंद अडसुळे वय ३५ यांच्या वडिलांकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच अकोट फाईल पोलिस स्टेशनमध्ये देऊन ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. संजय कुंभारे, अरुण खंडाळे, रामेकर यांनी उगवा येथे घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह अकोला येथे उर्वरित तपासासाठी पाठवला. आशिष अडसुळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...