आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबाच्या धान्याचा काळाबाजार:5 लाख 36 हजार रुपये किंमतीचा अडीचशे क्विंटल तांदूळ जप्त; काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडला

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशन दुकानातील काळा धंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. रास्त भाव दुकानातील 5 लाख 36 हजार रुपये किमतीचा सुमारे अडीचशे क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना पकडण्यात आला आहे. हा तांदूळ काळ्या बाजारात विक्री घेऊन जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथून एक ट्रक रास्त दुकानाचा तांदूळ गोंदियाकडे जात असल्याच्या गुप्त माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा नजीक सापळा रचला. दिलेल्या माहितीनुसार, एक टाटा कंपनीचा ट्रक बाळापूरकडून येताना पोलिसांच्या दृष्टीस पडला. पोलिसांनी ट्रक जवळ येताच थांबवण्याचा इशारा दिला. यावेळी पोलिसांनी ट्रकची झाडाझडती घेतली.

ट्रकमध्ये 245 क्विंटल तांदूळ आढळून आला. याबाबत चालकाला पोलिसांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा तांदूळ बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील असून गोंदिया येथील काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी या प्रकरणी तानाजी शिंदे रा. बिजवडी व अनिल विजय कचरे रा. गिरझणी, ता. माळशिरस यांना ताब्यात घेऊन ट्रकसह एकूण 23 लाख 47 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...