आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पिंजर- कारंजा रोडवर‎ अपघातात दोघे जखमी‎

अकाेला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा ते पिंजर रोडवर‎ सोमवारी १३ मार्चला रात्री पिंजर‎ येथून रंगकाम करून गावी जाताना‎ मधू जाधव वय ४९, आकाश राठोड‎ वय ३८ दोघेही रा. खेर्डा खुर्द यांच्या‎ दुचाकीला चारचाकीने धडक दिली.‎ यात दोघे जखमी झाले.‎ या घटनेची माहिती पिंजर येथील‎ व्यावसायिक विठ्ठल वडुरकर यांनी‎ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन‎ फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा‎ आपत्कालीन शोध व बचाव‎ पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे‎ यांना दिली.

त्यांनी मयुर सळेदार,‎ सागर आटेकर यांना रुग्णवाहिका‎ घेऊन मदतीसाठी रवाना केले. दोन्ही‎ जखमींना उपचारासाठी पिंजर‎ येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.‎ वेळीच मदत मिळाल्याने जखमींच्या‎ नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...