आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव बस दुचाकीवर आदळून 2 जण ठार:एसटीने 100 फूट नेले फरफटत, मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने काढला

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. या, भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर एक जण बसच्या चाकाखाली येत रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत दबला होता.

राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील गजानन जगदेवराव पारसकर (रा. पारस) व योगेश विष्णूपंत गोळे (रा. वाडेगाव) हे दोघेही जागेवरच ठार झाले. मृत हे (एमएच-30-बीएम-8440) या क्रमांकाच्या दुचाकीवरून पारसहून वाडेगावकडे जात होते. दरम्यान कान्हेरी फाट्यावर महामार्गावर ओलांडत असताना अकोल्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या (एमएच-20-बीएल-3829) या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधीकारी गोकुळ जी.राज, बाळापूर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अफरोज शेख, श्रीराम जाधव, पोलिस कर्मचारी संतोष सोळंके, गजानन शिंदे, विठ्ठल रायबोले, अक्षय देशमुख, वाहतूक पोलिस कर्मचारी सलीम खान पठाण, वर्मा यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

एसटीने तब्बल 100 फूट नेले फरफटत

मृतकांची दुचाकी रस्ता ओलांडत असताना महामार्गावर पोहोचताच एसटीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व एसटीची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीसह दोघांनाही एसटीने तब्बल 100 फुटांपर्यत फरफटत नेले.

मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने काढला

अपघातानंतर योगेश गोळे हा एसटीच्या समोरील चाकात अडकला. त्याला फरफटत नेत एसटी महामार्गाच्या कडेला असलेल्या मातीच्या भरावावर जावून थांबली. योगेश हा चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; मात्र त्याचा मृतदेह मातीत दबल्या गेला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर जेसीबीच्या साहाय्याने बस उचलत मृतदेह काढण्यात आला

बातम्या आणखी आहेत...