आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामीण भागात बांधली दोन लाख शौचालये

अकाेला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत ग्रामीण भागात शाैचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी शाैचालय बांधण्यासाठी माेहीम राबवली असून, जिल्ह्यात १ लाख ९५ हजार १४१ शौचालये बांधली. दरम्यान आतापर्यंत २ लाख ९१६५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. ही संख्या ग्रामीण भागातील कुटुंबांच्या तुलनेत कमी असल्याने शौचालयांचे बांधकाम वाढवण्यासह,त्याचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रत्येक घरी शौचालय असायलाच हवे, या महत्त्वाकांक्षेने केंद्र सरकारकडून शौचालय उभारण्याचे लक्ष समोर ठेवले होते. तीन दिवसांपूर्वीच जागतिक शौचालय दिन झाला. यानिमित्ताने शाैचालय बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला. स्वच्छ भारत अभियानाला जिल्ह्यातूनही भक्कम बळ मिळाले. त्यानुसार मार्चपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९५,१४१ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. त्यानंतर सुद्धा शौचालयाच्या बांधकामावर भर देण्यात आल्यामुळे आतापर्यंत २ लाख ९ हजार १६५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र त्यानंतर सुद्धा दरारोज शेकडो नागरिक अजूनही उघड्यावर शौचास बसतात. त्यांच्यामध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजवणे काळाची गरज आहे.

पुढाकार घेणे आवश्यक
शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत ग्रामीण भागात शाैचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरी शाैचालय बांधण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासाठी २०११ मध्ये राबवण्यात आलेल्या पायाभूत (बेसलाइन) सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला. ५३३ ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी नियाेजन करण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) लाभार्थी कुटुंबांना शाैचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रूपयांचे अनुदानही देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...