आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचे दाेन नवे रुग्ण; एकास डिस्चार्ज

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे आरटीपीसीआरचे ५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये दोन बाधित रुग्ण आढळले आहेत.

तर एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. दोन बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून, ते अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत. आता सक्रीय रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह अहवालाची संख्या ६६०३६ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...