आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचे दोन नवे रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या 13 वर

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महावदि्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून रवविारी, १२ जूनला सायंकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे १८५ अहवाल प्राप्त झाले आहेत. आरटीपीसीआरच्या या अहवालांमध्ये दोन रुग्ण पॉझिटवि्ह आढळल्याने एकूण सक्रीय रुग्णांची संख्या १३ झाली आहे. यातील चार रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयातील अतदिक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

रवविारी प्राप्त झालेल्या कोविड चाचण्यांच्या अहवालात एक महिला व एक पुरुष असे दोन रुग्ण बाधित आढळले आहेत. रुग्णांमध्ये मूर्तजिापूर येथील २५ वर्षीय महिला व शविणी अकोला येथील २३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ववििध भागात सलग रुग्ण आढळत असल्याने सतर्कगता बाळगण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने चाचणी केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. मात्र अनेक रुग्ण लक्षणे अंगावर काढत असल्याने गंभीर अवस्थेत दाखल करावे लागते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.

हयगय ठरेल संसर्ग वाढीचे कारण : जिल्ह्यात गेल्या काही दविसांपासून सलग कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षात्मक खबरदारी घेऊन बाळगणे आवश्यक आहेत. मात्र रुग्ण वाढत असले तरी अनेक ठिकाणी धोकादायक रित्या सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जेथे सर्दी, तापाच्या रुग्णांची वर्दळ असते अशा शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही सुरक्षात्मक खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिक आणि प्रशासनाची हयगय संसर्ग वाढीचे कारण ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...