आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्चार्ज:कोरोनाचे दोन नवे रुग्ण; दोन जणांना डिस्चार्ज ; बुधवारी आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी १५ जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर)१८८ अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह तर खासगी प्रयोगशाळेतून एकाचा असे एकूण तीन जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आले. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळवण्यात आले आहे. बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून, ते रुग्ण मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. खासगी प्रयाेगशाळेच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून दोघांना डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. सक्रिय रुग्ण २१ ः जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६५२०४(४९१८६ + १५०३८ +९८०) आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २१ सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...