आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:भरधाव बस दुचाकीवर आदळल्याने कान्हेरी फाट्यावर दोन जणांचा मृत्यू

बाळापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्यावर मंगळवारी २ नाेव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर एक जण बसच्या चाकाखाली येत रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत दबला होता. राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.

यामध्ये दुचाकीवरील गजानन जगदेवराव पारसकर (रा. पारस) व योगेश विष्णूपंत गोळे (रा. वाडेगाव) हे दोघेही जागेवरच ठार झाले. मृतक हे एमएच-३०-बीएम-८४४० या क्रमांकाच्या दुचाकीवरून पारसहून वाडेगावकडे जात होते. दरम्यान कान्हेरी फाट्यावर महामार्गावर ओलांडत असताना अकोल्याच्या दिशेने भरधाव येणाऱ्या औरंगाबाद आगाराच्या एमएच-२०-बीएल-३८२९ या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ जी.राज, बाळापूरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अफरोज शेख, श्रीराम जाधव, पोलिस कर्मचारी संतोष सोळंके,

बातम्या आणखी आहेत...