आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:मुलीच्या विनयभंग प्रकरणी दोन जणांंना सुनावली शिक्षा

अकाेला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला सात वर्षांची शिक्षा तर त्या आरोपीला मदत करणाऱ्यासही पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने सोमवारी दिला.

आकाश दशरथ मुठाळ याच्या वर भादंवि कलम ३५४, ४५२, ४२७, ५०६ पॉक्सो कायदा कलम सात-आठ नुसार पातूर पोलिस स्टेशनमध्ये २७ जून २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून सात वर्षे सक्तजुरीची शिक्षा व एकूण रू ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येक कलमा अंतर्गत तीन महिने अतिरिक्त साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. याशिवाय सूरज वसंता इंगळे (२५) यास आकाश मुठाळ याला मदत व प्रोत्साहन दिल्याच्या आरोपात दोषी ठरवून पोक्सो कायदा कलम १६-१७ नुसार पाच वर्षे सक्तजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकारतर्फे आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी तपास केला होता. पोलिस कर्मचारी रत्नाकर बागडे व एएसआय प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...