आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मनपा मालमत्ता कर विभागाने मनपाच्या उत्तर झोनमधील दोन मालमत्ता सील केल्या. दरम्यान थकीत कराचा भरणा नागरिकांनी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे आव्हान मनपासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे थकीत तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
उत्तर क्षेत्रातील खेतान जीन, जुना कॉटन मार्केट येथील वाॅर्ड क्र. सी-३ मालमत्ता क्र. १७११ धारक शकीला खातून हाजी सलालोद्दीन व मो. रिजवान पिता हाजी सलालोद्दीन यांच्याकडे सन २०१७-१८ ते आजपर्यंतचा १ लाख १७७४६ रुपये तसेच उत्सव संकुल, गिरीराज पॅलेस, गांधी रोड येथील वाॅर्ड क्र. सी-१ मालमत्ता क्र. ८९२ धारक श्रीकांत मालोकार यांच्याकडे सन २०१८-१९ ते आजपर्यंतचा ४ लाख ६८०४४ रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. वारंवार सूचना करूनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने अखेर या दोन्ही मालमत्तांना सील लावले.
ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये आणि कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांच्यासह सहायक कर अधीक्षक हेमंत शेळवणे, दिलावर खान, संदीप जाधव, राजेश शिरसाट, चंदू मुळे, सुरक्षारक्षक जय गेडाम, प्रवीण पाचपोर, मो. अजहर आदींनी केली. थकीत मालमत्ता करावर दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारले जाते. त्यामुळे ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. त्यांनी आपल्या थकीत कराचा भरणा करून जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.