आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतून घेतली उडी:छत्तीसगडच्या दोन बहिणींनी धावत्या रेल्वेतून घेतली उडी; नैराश्यातून उचलले पाऊल

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडच्या दोन मुलींनी मध्य रेल्वेच्या गायगावनजीक मनारखेड चौकी दरम्यान धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री या दोन्ही मुलींनी मुंबई-कलकत्ता रेल्वेतून पाठोपाठ उडी घेतली. दोघीही सख्ख्या मावसबहीणी असल्याची ओळख गुरुवारी पटली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

अकोल्यातील मनारखेड रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.

तपासा दरम्यान, दोन्ही मुलींची ओळख समोर आली आहे. कुमारी बेबी राजपुत (वय १९, रा. चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि कुमारी पूजा गिरी, (वय १९, रा. चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) असे या मुलींची नावे आहेत. या मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआयला जातो असे सांगून घर सोडले होते. त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलिस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, या दोघांनी मुंबई-कलकत्ता रेल्वेमध्ये प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. असे असले तरी प्रकरण नेमके काय आहे, हे पोलिस तपासाअंतीच समोर येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नैराश्यातून उचलले पाऊल
दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात असून त्या थेट कॉलेजमधून आल्या असाव्यात. त्यांनी नैराश्येच्या भरात हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...