आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दोन अट्टल वाहन चाेरटे गजाआड; 20 दुचाकी जप्त, अन्य जिल्ह्यांतही चोऱ्या

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चाेरी करणाऱ्या टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी २० दुचाकी जप्त केल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ६ लाख ८५ हजार आहे. या दुचाकी चाेरी प्रकरणी अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. घर किंवा बाजारपेठेतून वाहन लंपास हाेत आहेत. अनेकदा तर घराबाहेर साखळदंडाने बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला गेली

संशयितास ताब्यात घेतल्यानंतर झाला उलगडा
अकोल्यात राहणाऱ्या सुरेश रामभाऊ खरबडकर (३०) याने अकोलासह, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर व अन्य जिल्ह्यांत मोटर सायकली चोरी केल्या आहेत अशी माहिती पोलिसांना िमळाली. पोलिसांनी या संशयितास ताब्यात घेतले. मात्र त्याने प्रथम उडवा-उडवीचीअकोल्यासह बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात गुन्हे दाखल
दुचाकी चाेरीचे अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. यात अकाेला जिल्ह्यातील खदान, सिटी कोतवाली सिव्हील लाइन्स, रामदासपेठ, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूरसह खामगाव शहर, मंगरूळपीर, दर्यापूर पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील १६ मोटर सायकलींचा समावेश आहेत.

उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर चाेरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला. आरोपीचा मित्र सिद्धांत महेंद्र सुरडकर (रा. म. फुले नगर, सिंधी कॅम्प, अकोला) यानेही त्याला मदत केली. पोलिसांनी आराेपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी आराेपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...