आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा ठाकरे गटाच्या मतदाससंघातील कामांना विराेध:पाणी पुरवठा याेजेनेतही फडणवीसांनी गलिच्छ राजकारण केले - नितीन देशमुखांचा आरोप

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याेजनेला स्थगिती दिल्याने उद्या विधिमंडळ परिसरात उपाेषण करणार

भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदाससंघातील विकास कामांना विराेध असून, ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणी पुरवठा याेजनेला स्थगिती देत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टिका ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

राजकारण करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ आपण मंगळवारी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमाेर उपाेषण करणार असून, अकाेल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ५ हजार ग्रामस्थ आंदोलन करतील, असाही इशारा त्यांनी दिला.

खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या व शिवसेना आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. याेजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा हाेणार असून, याला काही ग्रामस्थांनी विराेध केला आहे. दरम्यान बाळापूरचे आमदार देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला. वानमधून शेगाव, जळगाव जामाेद येथेही पाणी पुरवठा हाेताे. मात्र त्या ठिकाणी भाजपचा आमदार असून, बाळापूर येथे मात्र शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजपचे विराेध करीत आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा याेजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवण्यात येत आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकराला ग्रामस्थ हे हिंदू दिसत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला.

पत्रकार परिषेदला गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पागृत, उमेश जाधव आदी हाेते.

न्यायप्रविष्ट असतानाही स्थगिती

६० गावे पाणी पुरवठा याेजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली. याेजनेची किंमत २१९ काेटी रुपये असून, प्रत्यक्ष याेजनेवर १९२ काेटी रुपये खर्च हाेणार आहेत. त्यापैकी १०८ काेटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ काेटीचे देयकही अदा करण्यात आले आहे. असे असनाताही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याेजनेला स्थगिती देत स्वत:ची बाैद्धिक दिवाळखाेरीच जाहीर केली, अशी टीका आ.. देशमुख यांनी केली.

...तर सरकारने दखल घ्यावी

प्रत्यक्ष वान प्रकल्पासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित झालेली नाही, असे आमदार देशमुख म्हणाले. मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली चार-पाच भाजप कार्यकर्त्यांनी पाणी आरक्षणाला विराेध केला आणि अकाेटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्र दिल्याने याेजनेला स्थगिती देण्यात आली. आता मंगळवारी शेकडाे ग्रामस्थांकडून हाेणाऱ्या आंदोलनाची दखल पाण्यावरूनही राजकारण करणारे शिंदे-फडणवीस सरकार घेईल काय, असा सवाल आमदार देशमुख यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...