आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे:उपसभापतिपदासाठी दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी फिरवला होता

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली ३० वर्षे मी शिवसेनेत होतो. नगरसेवक आणि आमदार असताना आपल्यावर सातत्याने अन्याय झाला. मी मंत्रिपद कधी मागितले नव्हते. मात्र, विधान परिषदेचे उपसभापती पदाचा हट्ट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता. त्यांनी उपसभापतीपद देऊ केले होते. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, असा घणाघाती आरोप गुरुवारी शिंदे गटात गेलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

बाजोरिया यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह २६ पदाधिकाऱ्यांनी उद्धव सेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात गुरुवारी प्रवेश केला. त्यानंतर शुक्रवारी आमदार बाजोरिया यांनी त्यांच्यातील खदखद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. ते म्हणाले की, मी शिवसेनेला दोन दोन आमदार दिले. त्या बदल्यात मला काय मिळाले, ३० वर्षे आमदार असताना उपसभापती पदासाठी पक्षप्रमुखांकडे हट्ट धरला होता. त्यावर आपल्याला अडीच वर्षांसाठी पद देण्याचा शब्द दिला होता.

मात्र, नंतर आपल्याला न देता महिलेला द्यायचे असल्याचे कारण समोर कशिवसेनेचा वापर कधीच कमाईसाठी केला नाही बाजोरिया म्हणाले की, आपण कधीच शिवसेना पक्षाचा वापर कमाईसाठी केला नाही. पुढेही करणार नाही. माझ्या आर्थिक त्रासामुळे एखादा अधिकारी रजेवर किंवा जिल्हा सोडून गेला, असेही कधी घडले नाही. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना उभी करण्याचा आपला संकल्प आहे. रून निलम गोऱ्हे यांना उपसभापती बनवले. उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. शिवसेनेकडे निवडून येण्याइतके मतदान नसताना आपण सलग पाचवेळा निवडून आलो. हिंगोली परभणीमध्ये शिवसेनेची उमेदवारी घ्यायला कुणी तयार नव्हते अशावेळी आपण तिथूनही सेनेचा आमदार म्हणून मुलगा विप्लव यांस निवडून आणले.

बातम्या आणखी आहेत...