आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा आदेश:खुल्या जागेवरील शाळेची अनधिकृत इमारत पाडली ; महापालिकेच्या पथकाने केली कारवाई

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरक्षण मार्गालगत हरीश-अश्विन कॉलनीतील खुल्या जागेत (ओपन स्पेस) बांधण्यात आलेली शाळेची अनधिकृत इमारत न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या पथकाने सोमवारी ५ डिसेंेबर रोजी जमिनदोस्त केली. हरीश अश्विनी कॉलनीमधील रहिवासीकरता असलेला खुला भूखंड सर्वे न. २६/२ मौजे मलकापूर यावर विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्था यांनी अतिक्रमण करून शाळा व महाविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत स्थानिक रहिवाशांनी १९९२ मध्ये न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने ३१ जानेवारी २०१३ रोजी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. परंतु विदर्भ ग्रामिण शिक्षण संस्थेने स्टे मिळवून जिल्हा न्यायालयात अपिल केले. न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयाने २०१३ चा न्यायालय कनिष्ठ स्तर अकोला यांचा निर्णय कायम ठेवून संपूर्ण अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...