आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून अतिक्रमण हटाव जोरात:दुकानावरील शेड, पार्कींगला अडथळा ठरणारे ओटे भूईसपाट

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी मुख्य पोस्ट ऑफीस ते सुधीर कॉलनी मार्गावरील वाहतुकीस तसेच पार्किग मध्ये अडथळा ठरणारे अतिक्रमण अतिक्रमण हटाव पथकाने हटवले. यात दुकानांचे शेड तसेच ओट्यांचा समावेश होता. तसेच काही चारचाकी गाड्याही पथकाने जप्त केल्या.

शहराच्या सर्वच मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकीकडे विविध मार्गावर लघु व्यावसायीक आपली दुकाने थाटतात अथवा चारचाकी गाड्या लावून व्यवसाय करतात तर दुसरीकडे व्यावसायीकांनी आपल्या दुकाना समोर ओटे बांधले आहेत. या ओट्यांमुळे आलेल्या ग्राहकाला आपली गाडी दुकाना समोर पार्क करता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला तर अनेकवेळा रस्त्यावर उभी करावी लागते. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्त्याचे कॉक्रीटीकरण केल्या नंतरही रस्ते अरुंद झाले आहेत.

या प्रकारामुळे गजबजलेले रस्ते आणि विस्कळीत वाहतुक असे चित्र शहरात मुख्य मार्गावर पाहावयास मिळते. याबाबी लक्षात घेवून तसेच वाहतुक सुरळीत व्हावी, या हेतूने शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सोमवार पासून राबविण्यात येत आहे.

  • सोमवारी शहर कोतवाली चौक ते टिळक रोड, अब्दुल हमीद चौक, अकोट फैल पोलिस ठाणे.
  • मंगळवारी खुले नाट्यगृह चौक ते फतेह चौक, दीपक चौक - दामले चौक ते रेल्वे मालधक्का चौक
  • बुधवारी गांधी चौक-महंमदअली चौक-सुभाष चौक-फतेह चौक
  • गुरुवारी मुख्य पोस्ट ऑफीस ते सिव्हिल लाईन चौक-सिव्हिल लाईन चौक ते जवाहर नगर चौक ते सुधीर कॉलनी पर्यंत अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.

या मोहीमेत 30 दुकानांचे बाहेर आलेले शेड तोडण्यात आले तर पार्किग मध्ये अडथळा ठरलेले 35 दुकांनासमोरील ओटे भूईसपाट करण्यात आले. ही मोहीम पूर्व झोनचे झोनल अधिकारी विजय पारतवार, सुनिल इंगळे, प्रविण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रुपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उप‌र्वट, कविता सगडे आदींनी राबविली.

उत्तर झोनचे झोनल अधिकारी विठ्ठल देवकते, हेमंत शेजवणे, सुनिल इंगळे, प्रविण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रुपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उप‌र्वट, कविता सगडे आदींनी राबविली.

अतिक्रमण हटाव मोहीमेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी नेहरू पार्क चौक-सिव्हिल लाईन चौक-रतनलाल प्लॉट चौक-दुर्गा चौक ते बिर्ला चौक या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...