आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती रॅली:हर घर तिरंगा अभियानांतर्गत खेंडकरच्या विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जुने शहरातील खेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन केले हाेते. भारत माता की जय चा नारा देत हर घर तिरंगा जनजागृती माेहीम राबवली. रॅलीची सुरुवात मुख्याध्यापक नीलेश खेडकर व प्राथमिकचे मुख्याध्यापक अल्केश खेडकर यांच्या हस्ते करण्यात आली. ही रॅली भगीरथ वाडीतून हरिहर पेठ ते वाशीम बायपास मार्गे शाळेच्या प्रांगणात अाल्यावर समारोप करण्यात आला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब खेंडकर, विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक नीलेश खेंडकर, यमुनाबाई खेंडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर, शाळेच्या कोशाध्यक्ष मृणालिनी खेंडकर, सहसचिव अस्मिता खेंडकर तर शिक्षक प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत व गोपाल वानखडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या वेळी शाळेतील शिक्षक आशा काळे, उषा उबाळे, कांचन सिरसाट, सुरेश सुरत्ने, प्रशांत काळे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...