आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाड्यात बेरोजगारांच्या नोंदणीनंतर त्यांना तीन क्षेत्रातील रोजगार निमिर्तीसाठी मार्गदर्शन, सहाय्य करणार आहे. यात शासकीय व खासगी नोकरी, उद्योग-स्वयंरोजगार आिण कृषी पूरक उद्योगाचा समावेश करण्यात येणार आहे. बेरोजगारांची जात, संवर्गचाही नोंद होणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील रोजगार युवक-युवतींची नोंदणी व रोजगार निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाड्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हा पंधरवाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल ) ते महाराष्ट्र दनि (१ मे) या कालावधीत राबवण्यात येणार आहे. गावागावात विविध यंत्रणांमार्फत पोहोचून गावातच बेरोजगारांची नोंदणी करण्यात येणार आहे.
पालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाडा या नोंदणीद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे रोजगाराची आवश्यकता व युवक युवतींमधील कौशल्य यांची सांगड घालून युवक युवतींना रोजगार मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणा सहकार्य करणार आहे.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन : खासगी, शासकीय, निमशासकीय, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवकांना तज्ज्ञांचे माेफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. पोलिस, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना पोलिस प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षणबाबत मार्गदर्शन करणार आहे. खासगी कंपन्यांत नोकरीस इच्छुक युवक-युवतींनाही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणार आहे.
या यंत्रणा होणार अभियानात सहभागी ः नोंदणी पंधरवाडा मोहिमेत सरकारच्या विविध यंत्रणा सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रोजगार स्वयंरोजगार, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रादेशिक पोलिस ट्रेनिंग स्कूलचे प्राचार्य यांच्या समन्वयातून हे नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे.
बेरोजगारांकडूनच अर्जाद्वारे होणार नोंद
पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्यात गावांमध्ये जाऊन ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व कोतवाल यांच्याकडून बेरोजगारांना अर्जाचे वितरण करण्यात येणार आहे. तेच बेरोजगारांकडून अर्ज भरून घेणार आहेत. यात नाव, वय, जात, संवर्ग, शिक्षण, पत्ता, मोबाइल नंबरची नोंद करावी लागणार आहे.
नव उद्योजकांना देण्यात येणार मार्केटिंगच्या टिप्स
उद्योग उभारणे आिण सुरू असलेल्या उद्योगाबाबतही नामवंत उद्योजकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग कसे करायचे, तसेच उद्योगाचा विस्तार कसा करायचा, याबाबतही अन्य नामवंत-यशस्वी उद्योजक नव उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.